जालना क्राईम

वहिणी-दिराच्या नात्याला काळीमा! बळीजबरीने शेतात नेऊन दिराचा वहिणीवर बलात्कार

जालना: दिर आणि वहिनीच्याच्या नात्याला काळीमा फसरणारी घटना जालना जिल्ह्यात घडलीय चुलत दिराने वहिनीला ज्वारीच्या शेतात फरफडत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खबळ उडालीय, या प्रकरणी २३ वर्षीय महिलेच्या तक्रारी वरून हसनाबाद पोलिस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसानी २२ वर्षीय बाबासाहेब विष्णु गव्हांडे या आरोपी तरुणाला अटक केली आहे.

images (60)
images (60)

दीर ज्वारीच्या शेतात लपून बसला होता!

महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महिला शेतात काडया वेचण्यासाठी गेली असताना, आरोपी बाबासाहेब विष्णु गव्हांडे हा चुलत दिर त्यांच्या ज्वारीच्या शेतात लपून बसला होता, त्यांनी ज्वारीच्या शेतातून येऊन मला बळजबरीने शेतात ओढत नेऊन माझ्यावर बळजबरी करत बलात्कार केला. बलात्कार करता वेळी मी आरडाओरड केली केल्याने माझा आवाज ऐकून बाजूच्या शेतात काम करत आलेला माझा नवरा गणेश हा पळत आला आणि त्यांनी मला आरोपी बाबासाहेब गव्हांडे यांच्या तावडीतून सोडवल. त्यावेळी बाबासाहेब यांनी तुम्ही जर कुणाला ही घडलेली घटना सांगितली तर तुम्हाला दोघांना जीवे मारून टाकू अशी धमकी देऊन पळ काढला.

बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

अशी तक्रार हसनाबाद पोलिस ठाण्यात दिल्या नंतर घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिस पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष घोडके आणि पोलिस उपनिरीक्षक अंकुश पाटोळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, आरोपी बाबासाहेब गव्हांडे याला अटक करून त्यांच्या विरुद्ध बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास हसनाबाद पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!