पाडुळी गावात अखंड हरिनाम सप्ताहला सुरवात
कुंभार पिंपळगाव :-
घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र पाडुळी येथील मारूती मंदिर येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान संगीत रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे
या सप्ताहात कथा व्यासपीठ ह .भ.प.सोनाली ताई करपे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प. रामदास म. घ्यार, ज्ञानेश्वर म.घुले यांचे आहे. दि. १२ रोजी ह.भ.प. विलास म. गेजगे बोथीकर दि. १३ रोजी ह.भ.प. माऊली म. खडकवाडीकर दि. १४ रोजी ह.भ.प.गजानन म. देठे दि. १५ रोजी ह.भ.प सोनाली ताई करपे दि. १६ रोजी ह.भ.प. पांडुरंग म. उगले दि. १७ रोजी ह.भ.प. आचार्य भगवंत म. पुरी दि. १८ दि रोजी ह.भ.प. संजय म. पाचपोर यांचे हरिकीर्तन होणार आहे तर दि.१९ रोजी ह.भ.प. माणिक म. रेंगे यांचे काल्याचे किर्तन होणार असून या सप्ताहात सुत्रसंचालन ह.भ.प. विलास म. घुले करणार आहेत. तरी परिसरातील भाविक भक्तांनी गाथा पारायण व किर्तन श्रवणाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.