जालना जिल्हा

कार्यकारी अभियंत्यांच्या आश्‍वासनानंतरही सेवानिवृत्त कर्मचारी उपोषणावर ठाम


सोमवार पासून जि. प. कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार
जालना (प्रतिनिधी) ः चार महिण्याचे थकीत सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती विषयक लाभ तात्काळ देण्यात यावे नसता येत्या दि. 14 फेबु्रवारीपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणीपुरवठा विभागा अंतर्गत हातपंप व विजपंप दुरूस्ती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

images (60)
images (60)


जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दि. 11 फेबु्रवारी रोजी दिलेल्या निवेदनात जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणीपुरवठा विभागा अंतर्गत हातपंप व विजपंप दुरूस्ती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मागील चार महिण्याचे वेतन थकीत आहे. सदर थकीत वेतन  व सेवानिवृत्ती विषयक लाभ तातडीने देण्यात यावा यासाठी दि. 28 जानेवारी 2022 रोजी निवेदन देण्यात आले होते. मात्र या निवेदनाची कोणतीही दखल जिल्हा परिषद प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने दि. 14फेबु्रवारी 2022 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला होता.


या अनुषंगाने ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डाखोरे यांनी संघटनेला पत्रव्यवहार करून देखभाल दुरूस्ती कर्मचाऱ्यांना कोणतेही लाभ द्यावयाचे असल्यास त्यास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे बंधनकारक असल्यामुळे देखभाल दुरूस्ती अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती विषयक लाभ देण्यासाठी  64 लक्ष रूपयांची रक्कम मंजुर करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या दि. 7 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला असून सर्वसाधारण सभेचे कार्य वृत्तांत अंतीम झाल्यानंतर देखभाल दुरूस्ती अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्यात येईल असे लेखी आश्‍वासन कार्याकारी अभियंता डाखोरे यांनी दिले आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतरही दि. 14 फेबु्रवारी रोजी आमरण उपोषण करण्याच्या निर्णयावर सेवानिवृत्त कर्मचारी ठाम असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फकीरा वाघ, जिल्हाध्यक्ष एस. ए. जाधव,  कार्याध्यक्ष एम. एम. देशमुख, कोषाध्यक्ष जी. एम. कांबळे, सचिव एम. टी. कार्लेकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!