शिवविचारांची रुजवण करणे ही प्रत्येकाची जवाबदारी : ना. टोपे
जालना / प्रतिनिधी
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती, धर्मियांना सोबत घेऊन जगाच्या पाठीवर आदर्श राज्य निर्माण केले. आजच्या काळात शिवछत्रपतींच्या विचारांची रूजवण करणे ही प्रत्येकाची जवाबदारी असून हे कार्य निष्ठेने पार पाडूया असा आशावाद आरोग्य मंञी तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज अभिवादन सोहळ्यात व्यक्त केला.
विश्ववंदनीय, रयतेचे राजे, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी (ता.19) जालना शहरासह जिल्हाभरात उत्साही व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
शिवछत्रपती सांस्कृतिक, क्रीडा मंडळ संचलित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सकाळी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात वेद मंत्रोच्चारात विधीवत दुग्धाभिषेक करण्यात आला .
यावेळी अंकुशराव राऊत, उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाषचंद्र देवीदान, कार्याध्यक्ष रवींद्र राऊत, सचिव सतीश जाधव, कोषाध्यक्ष अॅड. रवींद्र डुरे, उपाध्यक्ष विजयकुमार पंडित, खंडेश जाधव, विश्वासराव भवर, बबलू चौधरी, नंदकिशोर जांगडे, फेरोज अली, सुधाकर निकाळजे आदींची उपस्थिती होती.