देवी रेणुका विद्यालय, शंकरराव पाटील तौर शाळेत शिवजयंती साजरी
शंकरराव तौर पाटील प्राथमिक शाळा
19 फेब्रुवारी 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा शंकरराव तौर पाटील प्राथमिक शाळा शिवजयंती मोठया थाटात साजरी करण्यात आली.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदिप चव्हाण हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मोहन अवचार हे उपस्थित होते. यावेळी सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली .तसेच यावेळी शिक्षक निळकंठ खिस्ते, विजयकुमार काळे यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आपले मत व्यक्त केले. तसेच शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साबळे यांनी केले.तर आभार सहदेव वाघमारे यांनी मानले .
देवी रेणुका माध्यमिक विद्यालय, देवी दहेगाव.
देवी रेणुका माध्यमिक विद्यालय, देवी दहेगाव ता. घनसावंगी.जि. जालना.या शाळेत “छत्रपती शिवाजी महाराज जयंती ” मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर्दड आर. आय. हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणुन श्री.घोडके एम.जी.व श्री.राऊत ए.वाय.हे होते.यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन,त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थी मनोगत घेण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष व यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अमूल्य मार्गदर्शन केले. या वेळी कोविड -19 संसर्ग अंतर्गत मास्क व सामाजिक अंतर,या नियमांचे पालन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूञसंचलन श्री.सरोदे के.ई.तर आभारप्रदर्शन श्री.आर्दड आर.बी.यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.