जालना जिल्हा

विज्ञान आणि गणिताच्या 54 गुरुजींना मिळणार बढती

जालना / प्रतिनिधी

images (60)
images (60)

जालना जिल्हा परिषदेअंतर्गत अध्यापन करणाऱ्या 54 शिक्षकांना आता बढती मिळणार आहे. यामध्ये गणित आणि विज्ञान विषय शिकवणाऱ्या 54 शिक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी दिली आहे.

जालना जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये गणित आणि विज्ञान शिक्षक विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची गेल्या काही वर्षापासून कमतरता होती. त्यातच आता 54 शिक्षकांची बढतीने पदस्थापना होणार आहे.

त्यामुळे ज्या ठिकाणी रिक्त पदे आहेत अशा शाळांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज याबाबत एक महत्त्वाची बैठक जिल्हा परिषद कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत या 54 शिक्षकांना समुपदेशनाद्वारे बढती देण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली आहे.

लवकरच हे 54 शिक्षक बढतीद्वारे पदोन्नतीने विविध शाळांत पाठवण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!