घनसावंगी तालुका

मंजूर घरकुलासाठी वाळू उपलब्ध करण्याची पं.स.सदस्यांची तहसीलदाराकडे मागणी

बाणेगाव पंचायत समिती गणात मंजूर झालेल्या घरकुलासाठी वाळू उपलब्ध करून द्या.. शिवसेना पंचायत समिती सदस्य शितल उढाण यांची मागणी.

images (60)
images (60)

तिर्थपुरी प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील बानेगाव परिसरातील मंजूर घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्याकडे बाणेगाव पंचायत समिती गणाच्या शिवसेना पंचायत समिती सदस्या सौ शितल पुरुषोत्तम उढाण यांनी एका निवेदनद्वारे केली आहे

बाणेगाव पंचायत समिती गणात भोगावं, सौंदलगाव, बाणेगाव, विठ्ठल नगर,लिंगसेवाडी,शेवता, रामसगाव, जोगलादेवी, मुरमा, कंडारी अंबड इत्यादी गावे असुन प्रत्येक गावात रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना मधुन घरकुल मंजूर असून फक्त वाळू उपलब्ध नसल्याने लाभार्थी आपले उद्दिष्ट पूर्ण करु शकत नाही असे निवेदनात नमूद आहे . तसेच जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीला गोदावरीचा काठ उपलब्ध असुन नदीपात्रात भरपूर पाणी असल्याने वाळू उपसा करता येतं नाही तसेच वाळुघाट असलेली ग्रामपंचायत ही दक्षता समिती स्थापन करुन फक्त वाळू चे राखणं करते पण त्यांना वाळू उपसा करण्याचे अधिकार नाहीत ग्रामपंचायत च्या जबाबदारीवर त्यांना गौणखणीज भरुन घेऊन वाळू काढण्याचे अधीकार देऊन सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे


ताटात वाढलं पण खाता येईना अशी गत सध्या लाभार्थ्यांची झालेली आहे विशेष करून मागासवर्गीय बांधवांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात असुन त्यांना तातडीने वाळु उपलब्ध करून द्यावी नसता तहसील कार्यालय घनसावंगी येथे तारीख, वार व वेळ ठरवून घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्या सह आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


या वेळी निवेदन देताना पुरुषोत्तम उढाण, बालासाहेब उढाण, अशोक डोंगरे, निखिल फलके, रविराज उढाण, संतोष उढाण, सतिश बुराडे,सुदाम चव्हाण, सचिन उढाण, प्रदिप फलके उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!