परतूर तालुका

खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत श्रद्धा वायाळची चमकदार कामगिरी

images (60)
images (60)

चाकुर येथे झालेल्या खुल्या गटात दुसरी

दिपक हिवाळे /परतूर प्रतिनिधी
येथील  श्रध्दा नामदेव वायाळ हिने चाकूर (जि. लातूर) येथे झालेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेऊन चमकदार कामगिरी करून या स्पर्धेत दूसरा क्रमांक पटकावला आहे.
सावली स्पोर्ट क्लब चाकुर यांच्या वतीने दि १ व २ मार्च २०२२ रोजी खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये पुणे, बुलढाणा, बीड, सोलापूर, जालना, लातुर, बार्शी येथील खेळाडू सहभागी झाले होते. यात पुरुष, महिला वयोगट नुसार व महीला पुरुष एकत्रित व खुल्या गटात सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेचे आयोजक सावली स्पोर्ट क्लबचे डॉ. श्रीनिवास हसनाळे, ॲड धनंजय पाटील, सरदार मंगरुळे, ओमकार पोहरे यांनी परिश्रम घेत स्पर्धा यशस्वी केल्या.
यामध्ये श्रध्दा नामदेव वायाळ हिने खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत व्द्तिय क्रमांक पटकावला या यशाबद्दल आमदार बबनराव लोणीकर, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, भाजपा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, सभापती कपिल आकात, बॅटमेंटनचे जिल्हा सचिव नागोजी चिलकरवार, नगरसेवक संदीप बाहेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी आर. नवल,डॉ, शेषराव बाहेकर, डॉ. संदीप चव्हाण, उप मुख्यध्यापक डॉ.शेषराव वायाळ, बाबासाहेब तेलगड, पंडित निर्वळ, बाबासाहेब गाडगे, श्रीपाद तरासे, प्रशिक्षक परिमल पेडगावकर, तलाठी रविंद्र रेड्डी, दिगंबर लिपणे, उपप्राचार्य संभाजी तिडके, शिवा बल्लमखाने, शिवा स्वामी, गणेश स्वामी, प्रमोद राठोड, नितिन लाळे, भारत सवने, दत्ता जगदाळे, सह इतरांनी तिचे कौतुक केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!