शिवनगाव येथील मजुरांना मध्यांन्न भोजन योजनांचा लाभ सुरू
घनसावंगी प्रतिनिधी / नितीन तौर
कॉम्रेड गोविंद आर्द्ड यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या मध्यांन्न भोजन योजनेचा लाभ मंगळवार पासुन शिवनगाव येथे कामगारांना लाभ वाटपाची सुरुवात करण्यात आली.या मध्ये पोळी,भात,डाळ आणि भाजी या पदार्थांचा समावेश आहे,ही योजना गावापर्यंत पोहचविण्यासाठी कॉम्रेड गोविंद आर्दड यांनी कामगार विभागाशी पाठपुरावा केला.
यावेळी शिवणगाव येथिल गजानन भाऊ मित्रमंडळाचे विश्वजित अशोकराव तौर यांच्या मदतीने ही योजना पोहचण्यास मदत झाली यावेळी गावातील नागरिकांच्या वतीने कॉ.गोविंद आर्दड व भोजन पोहोच करणाऱ्या चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किरण मोरे, राजेआबा तौर,सरपंच अशोक तौर, किशोर तौर, मारोती तौर,विष्णु बापमारे,नितीन तौर,रामेश्वर तौर,मा सरपंच प्रकाश जिजा तौर,परमेश्वर तौर व ग्रामस्थ उपस्थित होते…