जालना क्राईम

शुल्लक कारणामुळे घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु मध्ये वृध्दाचा खून

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव / प्रतिनिधी
माशाचं जेवण देण्यास नकार दिल्याने वृध्दाचा खून केल्याची घटना पिंपरखेड बुद्रुक येथे घडली असून घनसावंगी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे . यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि . 27 मार्च 2022 रोजी रात्री 08.30 वाजेच्या सुमारास रामटेकडी वस्ती , बिरोबा मंदीराच्या शेजारी पिंपरखेड बुद्रुक ता . घनसावंगी जिल्हा जालना येथे फिर्यादी श्रीमती सुशीलाबाई मारुती नरोटे ( वय 62 वर्षे ) या त्यांच्या घरी पती मारुती ( वय 65 वर्षे ) , मुलगा राजाभाऊ ( वय 45 वर्षे ) व पुतण्या होनाजी वय ( 56 वर्षे ) हजर होते

त्यावेळी फिर्यादीचे पती , मुलगा व पुतण्या हे दारु पित बसले होते . साधारण 09.00 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या शेजारी राहणारा पांडुरंग ज्ञानदेव हांगे ( वय 30 वर्षे ) हा दारुच्या नशेत त्या ठिकाणी आला व त्याने फिर्यादी व घरातील मंडळीना ” जेवायला वाढा ” असे सांगितले . फिर्यादी व तिच्या घरातील मंडळीनी पांडुरंग यास त्यांनी केलेले मासे हे थोडेच असून ते तिघापुरतेच आहेत , हे समजाविण्याचा प्रयत्न केला . पांडुरंग यास मासे देणास नकार दिल्याने त्याने फिर्यादीचा मुलगा राजाभाऊ यास लोखंडी फुकणीने डोक्यात मारले , फिर्यादीचे पती व पुतण्या त्यास सोडविण्यास गेले असता त्यांनाही मारहाण केल्याने त्यामध्ये फिर्यादीच्या पतीचा मृत्यु झाला . फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन घनसावंगी पोलीस ठाण्यात कलम 302 , 324 , 506 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला . यातील आरोपी पांडुरंग हांगे हा घटना घडल्यानंतर फरार झाला होता . तो राहते घरी येणार असल्याची माहीती मिळाल्याने त्यास सापळा लावुन राहत्या घरामधुन अटक करण्यात आली . सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक विनायक देशमुख , अपर पोलीस देशमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन , पोलिस उपनिरीक्षक प्रदिप डोलारे , बाबासाहेब हरिंचद्रे , पोहेकॉ शामसुंदर देवडे , पोना रामदास केंद्रे , पोकॉ सुनिल वैद्य , पोकॉ बाळासाहेब मंडलिक , पोकॉ नवनाथ राऊत , पोकॉ नारायण घुनावत आदींनी पार पाडली .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!