घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार तरुण ठार

दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

पाथरी : उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रोलीखाली दुचाकी अडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. अमोल बालासाहेब काळे असे मयताचे नाव आहे. हा अपघात आष्टी-पाथरी रस्त्यावरील नखाते हदगाव बु (ता पाथरी)पाटीजवळ शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास झाला.

images (60)
images (60)

अमोल काळे याचे राजमुद्रा डिझिटल नावाचे दुकान कुंभार पिंपळगाव येथे आहे. कुंभार पिंपळगाव येथून अमोल बालासाहेब काळे (२२) व युवराज विष्णू काळे (दोघे रा. लिंबोनी ता. घनसावंगी ) हे दोघे शनिवारी सकाळी दुचाकीवरून (एमएच.२१. एयु.०८८८) पाथरीमार्गे परभणीकडे जात होते. १० वाजेच्यासुमारास नखाते हदगाव बु पाटीजवळ मरडसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डबल ट्राली ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी मागील ट्रोली खाली अडकली.

यात अमोल काळे जागीच ठार तर युवराज काळे गंभीर जखमी झाला. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. जखमीस पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळी उशिरा अमोलवर त्याच्या राहत्या लिबोनी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले .अमोल हा एकुलता एक असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .त्यांच्या पश्चात आई वडील, बहीण असा परिवार आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!