केवळ पदवी संपादन करण्यापेक्षा ज्ञान मिळवून मोठे व्हावे-पो. नि. प्रशांत महाजन

विद्यार्थ्यांनी शिकत असताना चांगल्या संगतीत राहावे:- दत्ता महाराज टरले
कुंभार पिंपळगाव / प्रतिनिधी

कुंभारपिंपळगाव येथील सदगुरु मँथ्स अॅण्ड सायन्स अकॅडमीच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, प्रमुख मार्गदर्शक दत्ता महाराज टरले, प्रमुख पाहुणे संजीव ढवळे तसेच अध्यक्षस्थानी आसाराम राऊत हे होते.
प्रमुख मार्गदर्शक दत्ता महाराज टरले यांनी निखळ मनोरंजनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापराच्या व्यसनापासून दूर व्हा असा महत्वाचा संदेश दिला.त्याच बरोबर त्यांनी 10 वि नंतर करियर कसे करावेव अभ्यासातून यश संपादन करण्यासाठी सातत्याची गरज असते,असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केवळ पदवी संपादन करण्याऐवजी ज्ञानाने मोठे व्हा ,तसेच मोठ्या पदावर जाण्यासाठी कुठल्याही वाशिल्याची गरज नाही .स्वतः व स्वतः च्या ज्ञानावर भरोसा ठेवा.यश तुमचेच आहे,असा मोलाचा सल्ला दिला.तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाप्रसंगी अश्विनी काळे, रोहिणी कंटूले,आकांक्षा गणकवार, माधुरी सावंत,शामल शिंदे,दिव्या अरगडे, श्रेया पतंगे, प्रतीक्षा शिंदे, कृष्णा तौर, भागवत तौर या विद्यार्थ्यांचे विशेष कामगिरी साठी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पूजा बिलोरे हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या अरगडे, रेणुका कुलकर्णी यांनी तर प्रस्ताविक विक्रम राऊत व आभार किशोर मोरे आणि अध्यक्षीय समारोप राम राऊत यांनी केले.पालक बाळासाहेब पांढरे पद्माकर आधुडे,भागवत सावंत, प्रवीण निकम ,मुरली भाऊ शिंदे, दत्तात्रय कंटुले,दत्तात्रय बिलोरे, आप्पासाहेब कंटुले, सोनाजी कंटूले आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.