जालना क्राईम

जालना:बंद हॉटेलच्या खुर्चीवर नवजात अर्भक सोडून नातेवाईक पसार


अर्भकाचा ताबा घेण्यास बालकल्याण समितीकडून अनास्था
बालकल्याण समितीच्या अनास्थेमुळे पोलीस रुग्णालयातच ताटकळले

images (60)
images (60)

जालना प्रतिनिधी

जालना ते अंबड रोडवर लालवाडी येथील संतोष आसाराम चव्हाण (४५) हे आज सकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना पारनेर शिवारात असलेल्या बंद सावता हॉटेलमधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला.त्यावेळी त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका खुर्चीवर कापडामध्ये पुरुष जातीचे नवजात अर्भक गुंडाळलेले आढळून आले.त्यानंतर त्यांनी हॉटेलमालक दामोधर खरे यांना झोपेतून उठवून माहिती दिली. त्या दोघांनी परिसरात काहीकाळ या अर्भकाच्या नातेवाईकाचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. अंबड पोलीस ठाण्याचे सपोनि. नितीन पतंगे यांना मोबाईलवरून याबाबत तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अर्भकास जालना येथी जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल केले.सध्या बाळावर उपचार सुरु असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. याबाबत भादंवि. 317 कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाळाच्या नाळाला स्टॅग लावलेला असून, उजव्या पायाच्या पंजाचा ठसा घेतल्याची शाईची निशाणी आहे, त्यामुळे त्याचा जन्म एखाद्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जन्म झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.या बाळाचा शासकीय बालकल्याण समितीकडे ताबा देण्यासाठी अंबड पोलीस सकाळपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते, मात्र, दिवसभर पोलिसांना कागदपत्रांच्या पूर्ततेच्या फेऱ्यात अडकवून चालढकल केली. शेवटी सायंकाळी उशिरा बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसाची सलग सुट्टी आहे, तुम्हीच सोमवारपर्यंत बाळाचा सांभाळ करा, असे पोलिसांना सांगून टोलवाटोलवी केल्याचे समजते. संबंधित अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे त्या नवजात अर्भकाचे तर हाल झालेच, त्याबरोबर अंबाडचे चार पोलीस कर्मचारी जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ताटकळत बसून आहेत.


या बाळासोबत अंबडचे पोहेकाँ. विष्णू चव्हाण, महिला पोना. सविता वीर, पोना. सुधाकर शेंडगे, देवधन ढेंगळे आदी रुग्णालयात आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!