जालना क्राईम
सराफा व्यापाऱ्यास गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून लुटले

जालना प्रतिनिधी -सराफा व्यापाऱ्यास गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून लुटले
जालना-मंठा रोडवर राममूर्ती शिवारात रात्री 7.15 वाजता घडली घटना
जालना येथील दुसाने नामक सराफा व्यापाऱ्यांची रामनगर (साका.) येथे दुकान आहे.आज रात्री दुकान बंद करून मोटारसायकल वरून येत असतांना त्यांना राममूर्ती शिवारात तीन जणांनी अडविले.यावेळी चोरट्यांनी गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्या जवळील अंदाजे 15 तोळे सोने दागिने लुटल्याचे समजते. पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.