जालना क्राईम

भर बाजाराच्या दिवशीच पेट्रोलपंपच्या मॅनेजरला पिस्तुलचा धाक दाखवून साडे सहा लाख लुटले

कुंभार पिंपळगाव :

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ते आष्टी रोडवर लिंबीफाटा येथे असलेल्या हरिभाऊ सोळंके यांचा श्रीकृपा पेट्रोलपंपवर बुधवारी आठवडी बाजार असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपाचे मॅनेजर सय्यद नईम हे साडेसहा लाख रुपये रक्कम बँकेत भरण्यासाठी मोटरसायकलवरून कुंभारपिंपळगावकडे निघाले असताना अर्धा किलोमीटर जात असताना .मागावर असलेल्या इंडिका कारमधून आलेल्या दोन इसमांनी भररस्त्यात अडवून, गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्या जवळील पैश्याची बॅग घेऊन कार जागीच वळवून परतूर च्या दिशेने पोबारा केला.

बुधवारी कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजार असल्याने या रोडवर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ होती, तरीही दरोडेखोरांनी लूटमार केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घटनेची माहिती कळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रात देशमुख,अंबडचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन,कुंभार पिंपळगाव पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक एस मरगळ यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!