ब्रेकिंग बातम्या

मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा

मुंबई | प्रतिनिधी

images (60)
images (60)

विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये धुसपूस पाहायला मिळाली. विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे राज्यात विधान परिषदेची निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे पाचही उमेदवार झाले तर, दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठे हादरे बसले आहेत. राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी निवडणुक पार पडली.

यामध्ये कॉंग्रेसचा एक उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं. कॉंग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सुर दिसून आला. कॉंग्रेसला 44 मतांपैकी 41 मतं मिळालीत. म्हणजेच कॉंग्रेसची तीन मते फुटली आहेत. दरम्यान, आमच्या पक्षाची मते फुटली, इतरांना काय दोष द्यायचा, असं वक्तव्य थोरात यांनी केलं होतं. अडीच वर्ष सत्तेत राहून आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकं कुठं आणि का चुकतंय याचा विचार करण्याची गरज असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलंय.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!