जालना जिल्हा

वाटूर येथे चारचाकी वाहनावरील ताबा सुटल्याने एक ठार, अन्यप्रवासी जखमी

माणिक आढे / वाटूर प्रतिनिधी

images (60)
images (60)

परभणीवरून जालन्याकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटून वाहन दुभाजकावर आदळून अपघात घडल्याची घटना वाटूर जवळील विठ्ठला हॉटेलजवळ घडली. या अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झाला असून अन्य प्रवासी जखमी झाले आहेत.


एका रिसेप्शनच्या कार्यक्रमाला परभणीवरून जालन्याकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक (एमएच 22 एएम 2474) या चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. गाडी पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली. ही घटना मंगळवारी 21 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली.
यात चालक सय्यद खाजा सय्यद पाशा (रा.अजिजा गल्ली परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला असून तर शेख जुनेद शेख अनवर (वय 26), शेख अश्फाक शेख माहेबूब (वय 20), सय्यद समीर युसूफ (वय 26), आरिफ खान पाशा खान (वय 20), शारेख खान, शेख अज्जू शेरू, सय्यद आमीर युसूफ (वय 18) (सर्व रा. परभणी) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी, शेख अख्तर भाई व स्थानिक नागरिकांनी मदत कार्य करत गाडीत फसलेल्या लोकांना बाहेर काढून वाटूर येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडी दूर करत वाहतूक सुरळीत केली.


घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे, आबासाहेब बनसोडे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, डी.जे. शिंदे, अंबादास दांडगे, चालक श्री धोत्रे यांनी भेट देत घटनेचा पंचनामा केला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!