जालना जिल्ह्यात कृषि विभाग राबविणार हा सप्ताह
जालना प्रतिनिधी :-
कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषि विभाग यांच्या वतीने जिल्ह्यात कृषि संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे ,
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी केली आहे. नाईक यांची कामगिरी लक्षात घेऊन वसंतराव नाईक यांच्या जंयतीनिमित्त राज्यात दरवर्षी १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यातील शेतकरी समुद्ध आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याचे स्वप्न वसंतराव नाईक यांनी पाहिले होते. त्यासाठी जालना जिल्ह्यात 25 जून ते 1 जुलै पर्यंत कृषी संजविनी सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री भीमराव रणदिवे यांनी सांगितले
१ जुलै ते ७ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे. यामध्ये पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या त्रिसुत्रीचा वापर कृषी विभाग करणार आहे. यासाठी कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ,व आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील.
काय असेल या उपक्रमात
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांना पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीचा अवलंब केला जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या सप्ताहांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांनी दररोज किमान एका गावातील तर उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, खालील तारखेला विषयनिहाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे
दि 25 जून रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रचार-प्रसार मूल्यासाखळी बळकटीकरण दिन
दि 26 जून 2022 रोजी पौष्टीक तृणधान्य दिन,
दि 27 जून 2022 रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन
दि 28 जून 2022 खत बचत दिन
दि 29 जून 2022 प्रगतिशील शेतकरी संवाद दिन
दि 30 जून 2022 रोजी कृषी पूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिन
दि 1 जुलै 2022 रोजी कृषि सप्ताहाची सांगता करून कृषी दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्री भीमराव रणदिवे यांनी सांगितले.
आजच्या काळात बळीराजा आर्थिकदृष्ट्या स्वंयपूर्ण होणे फार आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना अद्यावत कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. यासाठी कृषी संजीवनी सप्ताहांच्या माध्यामतून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळेल – शीतल चव्हाण (प्रकल्प संचालक ,आत्मा)
संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने शेतकरी बांधवांना भेटून, खते, सुधारित, बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान यांची माहिती कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषि विभाग प्रयत्नशील – श्री भीमराव रणदिवे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना)