कुंभार पिंपळगाव डॉक्टर असोसिएशनतर्फे वृक्षारोपण
कुंभार पिंपळगाव /प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव डॉक्टर असोसिएशनतर्फे कुंभार पिंपळगाव येथील अंबड पाथरी मुख्य रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी कुंभार पिंपळगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय आस्कंद, डॉ. गिरीधारी कासट ,डॉ. सूरज आर्दड, डॉ .प्रमोद पवार, डॉ. नारायण ढवळे, डॉ. सुहास साबळे, डॉ. कुस्तुभ देशमुख, डॉ .विष्णू माने, डॉ. अक्षय राठी,डॉ रुपेश लाहूटी,डॉ .अक्षय घेवारे, , डॉ. कृष्णा चव्हाण,डॉ. माजीद कुरेशी,डॉ. कुरेशी ,डॉ. जीवन तौर,डॉ. चव्हाण , डॉ. पुरूषोत्तम कावळे , लॅब टेक्निशन काशिनाथ घुंबरे, यांच्यासह राज्य पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष दिगंबर गुजर, छत्रभुज आनंदे, लक्ष्मण बिलोरे यांच्यासह ग्रामस्थाची उपस्थिती होती.
रस्त्याच्या दुभाजकाच्या मध्यभागी असलेल्या जागेत सत्तर पेक्षा अधिक अशोका ह्या प्रकाराच्या झाडाची लागवड करण्यात आली आहे
दरम्यान मार्केट कमिटीच्या परिसरातही लिंब, वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली गावातील डॉक्टर असोसिएशनने केलेल्या उपक्रमाचे परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.