जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या विरोधात शनिवारी किराणा मार्केट बंद
अध्यक्ष सतीश पंच यांची माहिती
जालना/प्रतिनिधी-
जीवनाशक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी कर लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दि. 16 जुलै रोजी होलसेल व रिटेल किराणा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पंच यांनी दिली.
सतीश पंच म्हणाले की, जीएसटीच्या नवीन धोरणानुसार जीवनाश्यक वस्तु, अन्नधान्य, गहु, पीठ, रवा, मैदा, दाळी, दुध, दुग्धजन्य पदार्थ, नॉन ब्रॅण्डेड वस्तुवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
याचा अधिभार सामान्य नागरीक व ग्राहकांना बसणार असुन याचा त्रास व्यापा-यांना सुध्दा होणार आहे. शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात शनिवार रोजी मार्केटयार्ड मधील संपुर्ण होलसेल व रिटेल किराणा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या होलसेल किराणा असोसिएशनने घेतलेला आहे. तरी शेतकरी, ग्राहक व संबंधीतांनी यांची नोंद घेवुन बंदला सहकार्य करावे, अशी विनंती सतीश पंच यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी केली आहे.