कोणत्या नेत्याच्या जवळच्या घरात सापडला पैशांचा ढीग
नवी दिल्ली : ईडीचे सध्या देशभरात छापासत्र सुरु आहे. ईडीकडून देशभरात विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये ईडीने एका प्रकरणात टाकलेल्या छाप्यात तब्बल 20 करोड पेक्षा जास्त रक्कम जप्त केली आहे.
आता तुम्ही म्हणाल एवढी रक्कम कोठे सापडली? तर ही रक्कम पश्चिम बंगालचे उद्योग मंत्री पार्थ चटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरात तब्बल 20 करोड रुपयांचा पैशांचा ढीगच सापडला आहे. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
ईडीने आता या प्रकरणात मंत्री पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना अटक केलं असून पुढची कारवाई त्यांच्यावर करण्यात येणार आहे. तर एवढे पैसे नेमकं कुठून आले? याचा देखील ईडी चौकशी करणार आहे.
कोण आहेत अर्पिता मुखर्जी? : अर्पिता मुखर्जी ह्या तृणमूल काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चटर्जी यांच्या जळवळच्या सहकारी आहेत. तर अर्पिता मुखर्जीने चित्रपटात देखील काम केलेले आहे. तसेच ओडिशी भाषेतील चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलेले आहेत.