जालन्याचे माजीमंत्री अर्जुन खोतकर शिवसेनेतच ?

जालना/प्रतिनिधी
शिवसेनेतून शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.जालन्यातही शिवसेनेला मोठा धक्का बसलेला असून माजीमंत्री शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेली आहे.
खोतकर यांच्याकडे नुकतेच उपनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात सामील झाल्याची माहिती मिळाली आहे.जालन्याचे मातब्बर नेते समजले जाणारे अर्जुन खोतकर शिंदे गटात दाखल झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
याबाबत अद्यापही माजीमंत्री खोतकर यांनी एका वृत्तवाहिनीला नुकताच दिलेल्या मुलाखतीत आपण ठाकरे गटात असल्याचे सांगितले आहे दरम्यान आपण मुख्यमंत्री याची भेट घेण्यासाठी गेलो असल्याचे त्याने स्पस्ट केले अद्यापही आपण शिवसेनेत असल्याचे खोतकर यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे