कुंभार पिंपळगाव येथील स.भु.प्रशालेत विद्यार्थी संसद निवडणूक संपन्न
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
श्री स. भु.प्रशाला कुंभार पिंपळगाव येथे विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीतून विद्यार्थ्यांना प्रत्येक्षात संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अनुभव देऊन लोकशाहीचा महोत्सव साजरा करण्यात आला. प्रशालेचे सन्माननीय मुख्यध्यापक श्री एम. एस.बिरारे सर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने तसेच उपमुख्याध्यापक श्री एस. टी. देठे यांच्या नेतृत्वाखाली प्रशालेच्या विद्यार्थी संसद विभागाच्या वतीने दिनांक21/07/2022 अर्ज वाटप पासून अर्ज भरणे, छाननी,प्रचारसभा व दिनांक 28/07/2022 रोजी प्रत्येक्षात मतमोजणी व आज दिनांक 29/07/2022 रोजी प्रत्येक्षात निकाल जाहीर करण्यात आला.मतदान प्रक्रियेत प्रतेक्ष्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेतील सर्व अनुभव जसे नाव तपासणी,स्वाक्षरी,शाई लावणे, बॅलेट पेपर वर मतदान करणे, तसेच मतदान कक्ष, मत पेटी इत्यादी सर्व अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्येक्षात देण्यात आले.मतदान नंतर मत पेटी सील करणे ही प्रक्रिया विद्यार्थ्यानं समोर पूर्ण केली. या संपूर्ण प्रक्रियेत वर्गशिक्षक हे एक क्रमांकाचे अधिकारी होते. तर क्रीडा शिक्षकानी मैदान पर्यवेक्षक तसेच शिस्त पालन व नियंत्रण चे कार्य केले. मतदान कक्ष व मत पेटी तयार करण्याचे काम कला शिक्षक श्री देवणुरे सर यांनी केले. मतमोजणी व संपूर्ण प्रक्रिया प्रत्येक्षात राबवून घेण्याचे काम विद्यार्थी संसद विभागाच्या वतीने श्री जीवरग सर,श्री चंडोल सर ,श्री व्यवहारे सर यांनी केले.
मतमोजणी प्रक्रिये वेळी प्रतेक्षात सर्व उमेदवार उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीत मतमोजणी व नोंदी घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत अध्यक्ष पदी..श्रीनाथ रकुडवाड(10अ) 135मते
सचिव पदी..तुषार थोरात(10अ)176 मते
सहल प्रतिनिधी…कू.तनुजा धुमाळ(10अ)141 मते
क्रीडा प्रतिनिधी…नवनाथ पवार(10अ)170 मते
विद्यार्थिनी प्रतिनिधी… कु. दिव्या अरगडे(बिनविरोध)
सांस्कृतिक प्रतिनिधी…सार्थक तांगडे(10अ) बिनविरोध
सह सांस्कृतिक प्रतिनिधी… कू. एकता दिलीप गणकवार(8अ) बिनविरोध
स्वच्छ्ता व शिस्त प्रतिनिधी… कू.अनुजा बिलोरे(10अ) बिनविरोध.
विद्यार्थ्यांचे नूतन मंत्रिमंडळ.. विद्यार्थी संसदे च्या सर्व विजेत्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्या्यापक तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका,तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.