घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल शाळेत आज (दि.३०) रविवार रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली.या परीक्षेसाठी कुंभार पिंपळगाव व गुंज केंद्रातील एकुण १०१ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आली होती.त्यापैकी ८७ परीक्षार्थींनी परीक्षा दिली.तर १४ परीक्षार्थी अनुपस्थित राहिले होते.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी एम.एन.हरदास,केंद्रप्रमुख शिक्षक सुनील खोडदे,महेश भोजगुडे,अविनाश मुळे,सुरेश उबाळे,बालाजी काकडे, तात्यासाहेब झाटे यांची उपस्थिती होती.