राजाटाकळी येथील सोसायटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलला बहुमत
कुंभार पिंपळगाव/ प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटीची संचालक मंडळाच्या एकूण १३ जागेसाठी रविवार (दि.१४) रोजी निवडणूक सुरळीत पार पडली.दरम्यान,सायंकाळी निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला.यात कर्मयोगी अंकुशराव टोपे पुरस्कृत राजेश टोपे शेतकरी विकास पॅनलने दहा उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला.
या निवडणूकीचा निकाल जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. विजयी उमेदवार व कंसात एकूण पडलेले मतदान खालील प्रमाणे :-
अशोक बाबासाहेब आर्दड,(२७८),आच्यूत लक्ष्मण आर्दड,(२८४),बळीराम सर्जेराव आर्दड (२८०),चिमाजी दगडू आर्दड (२७७),ज्ञानेश्वर बालाजी आर्दड (२७१), जनार्धन देवराव आर्दड (२८१), जनार्धन शंकर आर्दड (२७०),शिवाजी नारायण आर्दड (२७४),नंदाबा अभिमान बहीर (२९५),शशिकला धर्मराज बहीर (२९५), बाबू मेनाजी खरात (२९५),रामभाऊ लक्ष्मण व्यवहारे (२९३),गणेश वामनराव बागडे(२९६) यांचा समावेश आहे.