दिवाळी अंक २०२१

*सततच्या पावसामुळे उध्वस्त झालेल्या पिकांचे पंचनामे करा – माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर.

चत्रभुज खवल

images (60)
images (60)

मदतीसाठी लोणीकर घेणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट

प्रतिनिधी
संपूर्ण मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात सततच्या पावसाने अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्यक्षात अतिवृष्टी नसली तरी मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने मराठवाड्यात सहज जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत अशा पिकांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत अशा प्रकारच्या सूचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांना दिल्या.

मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून च्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तात्काळ पंचनामे करणे आवश्यक असल्याचे लोणीकर यांनी दूरध्वनी वरून जालना जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड व आर डी सी केशव नेटके यांच्याशी चर्चा करून तात्काळ सदरील पिकांच्या नुकसानीचा आढावा सादर करणेबाबत सूचना केली.

मराठवाड्यातील धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे सुरू केले असून जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तात्काळ पंचनामे सुरू झाले पाहिजे असेही लोणीकर यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले पंचनामे करत असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा याची काळजी घेण्यासंदर्भात देखील लोणीकरांनी सूचना केली यावेळी दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना लोणीकर म्हणाले की अतिवृष्टी किंवा सततच्या पावसाने ते 33 टक्के पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असेल तर त्या पिकांचे पंचनामे करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत त्यामुळे शासनाच्या आदेशाची वाट न पाहता ते 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेले आहे त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात असेही लोणीकरांनी यावेळी स्पष्ट केले

किती मदत द्यायची ते शासन ठरवेल, तुम्ही तात्काळ पंचनामे करा- लोणीकर यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई किती द्यायची हे सरकार ठरवेल परंतु तत्पूर्वी तुम्ही लवकरात लवकर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा अशा सूचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिल्या. त्यासाठी आपण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची आज भेट घेणार असून नुकसान भरपाई संदर्भात चर्चा करणार असल्याचे देखील लोणीकर यांनी यावेळी सांगितले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!