विरेगव्हाण तांडा येथील हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील ग्रामस्थांचा लोकसहभाग व गावातील लेक-जावई यांच्या वर्गणीतून ५१ फुट उंच शिखरापर्यंत हनुमान मंदिराचे बांधकाम करण्यात आले.यावेळी सलग तीन दिवस होम हवन,अभिषेक,मुर्ती स्नान यज्ञाची पूर्णाहूती देण्यात आली.गावातील लेक व जावई यांच्या उपस्थितीत कलशाचे पूजन करण्यात आले.सकाळी बैलगाडी सजावटीतून कलशाची शोभायात्रा काढण्यात आली होती.गावाचा वैभव असलेल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार,मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा तसेच कलशारोहण सोहळा रविवार (ता.२१) रोजी वृंदावन आश्रम येथील महंत तपस्वी योगानंद महाराज यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी असंख्य भाविक भक्तासह ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा उत्साहात पार पडला.त्यानंतर ह.भ.प.जानकीराम महाराज चव्हाण यांचा सुश्राव्य बंजारा भाषेत भजन सेवा संपन्न झाल्यानंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी टाळकरी, गायक,वादक,महिला,तरूण मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.