जालना क्राईमब्रेकिंग बातम्यामहाराष्ट्र न्यूजविडिओ बातमी

जांबसमर्थ येथील राम मंदिरात मुर्ती चोरीप्रकरणी गावकरी अन्न त्याग आंदोलन पावित्र्यात ;गावात शुकशुकाट


कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या मौजे जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील पंचधातूच्या श्रीराम,सिता,लक्ष्मण,हनुमान अशा सहा मुर्ती अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना सोमवारी ता.(२२) रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.या घटनेबाबत ग्रामस्थांसह भाविकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.मुर्तीची चोरी झाल्याने आज मंगळवारी रोजी मुर्तीविनाच पहाटेची आरती करण्यात आली असल्याची माहिती मंदिर देवस्थान समितीकडून मिळाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, मुर्ती चोरी झाल्याची खळबळ उडाल्याने येथील मंदिर परिसर व गावात शुकशुकाट वातावरण असल्याचे दिसून येत आहे. या घटनास्थळी घनसावंगीचे पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी चोवीस तास तळ ठोकून बसले आहेत.

अन्नत्याग आंदोलन करणार…

जांबसमर्थ येथील घडलेली घटना हि अत्यंत क्रुर व निंदणीय प्रकारे घडलेली आहे.त्यामुळे गावात सर्वत्र शोककळा पसरलेली आहे. चोवीस तास उलटून गेले तरी अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाही.त्यामुळे उद्या पासून मंदिरात अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

बाळासाहेब तांगडे
सरपंच, जांबसमर्थ

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!