जालना जिल्हाब्रेकिंग बातम्यामहाराष्ट्र न्यूज

Video :जांबसमर्थ येथील श्रीराम मूर्ती चोरीला गेल्याने अख्खे गाव बसले अन्नत्याग उपोषणाला !

images (60)
images (60)
जांबसमर्थ येथे त्या घटनेच्या निषेधार्थ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू


घनसावंगी: तालुक्यातील जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी पुजा करीत असलेल्या राममंदिरातील सहा मुर्ती अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या आहेत.या घटनेला तब्बल तीन दिवस उजाडले असून तपास संथगतीने सुरू आहे.मात्र,अद्यापही पोलिसांना आरोपींचा सुगावा लागलेला नाही.त्यामुळे ग्रामस्थांसह भाविकांत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांसह भाविक आज बुधवार (ता.२४) पासून मंदिरासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले आहेत.या घटनेने जांबसमर्थ या गावात दु:खाचा डोंगर कोसळलेला असून ग्रामस्थ, भाविक, महिला यांच्याकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.चोरून गेलेल्या मुर्त्या पोलिसांनी जलदगतीने तपास करून परत मिळवून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थ, महिला भाविकांकडून करण्यात येत आहे.या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

घटनेचा तपास सुरू आहे

जांबसमर्थ येथील घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेसह वरीष्ठ पातळीवर तपास सुरू आहे.मात्र,चोरीचा धागादोरा अद्याप सापडलेले नाही.लवकर शोध लावला जाईल.

प्रशांत महाजन
(पोलीस निरीक्षक घनसावंगी)

शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करणार….

जांबसमर्थ येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून पोलीसांना तपास लागलेला नाही.पोलीस प्रशासनाने येत्या दोन दिवसात शोध घ्यावा अन्यथा परीसरातील नागरीकांना घेवून शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येतील.

शिवाजीराव चोथे
(माजी आमदार)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!