लिबोनी येथील खून प्रकरणी ; आरोपीला दहा वर्षांची शिक्षा व दंड
घनसावंगी;
तालुक्यातील लिंबोनी येथील खुन प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने सुनावली शिक्षा पोलीस ठाणे घनसावंगी येथे फिर्यादी नामे सखाराम सिताराम काळे वय 32 वर्ष व्यवसाय शेती रा . लिंबोनी ता.घनसांवगी जि.जालना यांनी तक्रार दिली होती की , दिनांक 26/06/2019 रोजी सांयकाळी 05.00 वाजेच्या सुमारास माझा चुलत भाऊ एकनाथ आसाराम काळे यास तिर्थपुरी ते कुंभारपिंपळगाव रोडवर ईसम नामे मधुकर पंढरीनाथ काळे वय 32 वर्ष रा . लिंबोनी ता . घनसांवगी जि.जालना याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले असता फिर्यादी यांच्या चुलत भावाने पैसे न दिल्याच्या कारणावरुन मधुकर काळे याने त्याच्या हातातील चाकु एकनाथ काळे यांच्या पोटात खुपसुन गंभीर जखमी करुन खुन केला होता .
अशा तक्रारी वरुन पो.स्टे . अंबड येथे गुरनं 85 / 2021 कलम 302 भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोउपनि श्री . पी . पी . माने यांनी करुन मा . न्यायालयात आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते . मा . न्यायालयात सदर गुन्हयाचे साक्षी पुरावे तपासुन दोन्ही पक्षाचे युक्तीवाद ऐकुन दि .25 / 08 / 2022 रोजी अंबड येथील मा . जिल्हा व सत्र न्यायधीश मा . प्रल्हाद सी . भगुरे यांनी आरोपी मधुकर पंढरीनाथ काळे यास कलम 302 , भा.द.वि.मध्ये दोषी ठरवुन 10 वर्ष शिक्षा व प्रत्येकी 1,00,000 / – रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे .
सदर गुन्हयात सरकार पक्षातर्फ अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अॅड श्री व्ही . एन . चौकीदार यांनी काम पाहिले व त्यांना कोर्ट पैरवी सर्व पोलिस अंमलदार यांनी मोलाची मदत केली आहे .