जालना जिल्हा

जांबसमर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरण: आमदार बबनराव लोणीकरांनी यांची भेटजालना प्रतिनिधी
इ स 1535 साली समर्थ रामदास स्वामींच्या जांब समर्थ गावामध्ये स्थापित करण्यात आलेल्या राम सीता लक्ष्मणाच्या पंचधातूच्या ऐतिहासिक मूर्ती दिनांक 21 ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्या या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जांब समर्थ येथे जाऊन पोलीस प्रशासनातील विविध यंत्रणा व ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन ऐतिहसिक दुर्मिळ मूर्ती चोरी करणाऱ्या चोरट्यांना तात्काळ अटक करण्यासाठी जमीन अस्मान पाताळ एक करा परंतु आमच्या सर्वांचा आस्था असणाऱ्या श्री राम सीता लक्ष्मणाच्या मूर्ती चोरून नेणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या

images (60)
images (60)


मूर्ती चोरी संदर्भात गावकऱ्यांची चर्चा करताना आमदार लोणीकर म्हणाले की, राज्य पोलीस प्रशासनातील तांत्रिक टीम व जिल्हा पोलिस यंत्रणा या प्रकरणी पूर्ण ताकदीने कामाला लागली असून आज संध्याकाळ पर्यंत राज्य पोलीस प्रशासनाची तांत्रिक टीम
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्र दिडोरी प्रणित प.पु.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दादा यांनी तंत्कालिन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस यांच्या काळात दुष्काळ पडता होता त्यावेळी गुरुमाऊली वरुनराजाची मत्र कालभैरवाष्टकमंत्र सेवा सांगितली होती. तेव्हा ही सेवा केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊत पडला होता.हि आध्यात्मिक सेवा यावेळी आ.लोणीकर यांनी सांगितली.जाब समर्थ येथील सेवेकरी यांनी देखील श्री स्वामी समर्थ सेवा कालभैरवाष्क मंत्राचे पठव करावे.या घटनेच्या चौकशी साठी घटनास्थळी दाखल होणार आहे त्या मुळे निश्चितपणे चोरट्यांचा माग काढण्यात यश येईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला


तर यावेळी पोलीस प्रशासनाने ही राज्यातील ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी मूर्ती चोरी झाले आहेत त्या त्या ठिकाणच्या तपासाच्या पूर्ण शक्यता लक्षात घेऊन राज्यभरात हा शोध घेणे सुरू असल्याची माहिती यावेळी दिली
साधारणता दीड तास चाललेल्या या चर्चेदरम्यान आमदार लोणीकर यांनी अखिल हिंदुस्तानचे आस्थास्थान असलेल्या प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती चोरून नेणाऱ्या चोरट्यांनी आपल्या सर्वांच्या भावना दुखावल्या असून या दृष्ट प्रवृत्तींना अद्दल निश्चितपणाने
आणेल असे सांगतानाच परमेश्वर कृपेने निश्चितच चोरट्यांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश येईल अशा प्रकारचा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला


ज्या रामदास स्वामींनी महाराष्ट्र राज्यातील गावा गावामध्ये श्री हनुमानाचे मंदिर स्थापित केले अशा महान विभूतीच्या गावातील मंदिरामध्ये असलेल्या श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती चोरी जाणे ही गोष्ट वेदनादायक असल्याचे या वेळी आमदार लोणीकर यांनी सांगितले
दरम्यान भ्रमणध्वनी वरून जिल्हा पोलीस अधीक्षकांसी मूर्ती चोरीच्या तपासाविषयी यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी चर्चा केली


या बाबत बोलताना लोणीकर म्हणाले की, जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाच्या वेगवेगळ्या टीम मूर्ती शोध कार्यात लागले असून लवकरच चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश येईल असेही या वेळी आमदार लोणीकर यांनी सांगीतले या वेळी श्री समर्थ रामदास स्वामी यांचे अकरांवे वंशज भुषन महारुद्र स्वामी, पुजारी धनंजय देशपांडे, घनसांगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन, गुन्हे अन्वेषण विभागाचे स्थानिक अपराध विभागाचे श्री भुजंग,भाजपा तालुकाध्यक्ष संजय तौर, अंकुशराव बोबडे, सर्जेराव जाधव, कैलाश शेळके, बापूसाहेब आर्दड,रविंद्र तौर, बाळासाहेब आमोल काळे बहीर, सचिन जोशी, यूनूस सय्यद नाना सोळंके, सूशील तागंडे, शाम तांगडे, विलास तांगडे,गुलाबारराव तागडे लहु देवकर नारायण दादा तागडे नारायण वरकड सुरेश आप्पा तागडे किसन गिरी विष्णु धाडगे सोपनिल डवळे जगन तागडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!