जालना जिल्हा
जिल्ह्यातील दहा सहायक फौजदारांना श्रेणी उपनिरीक्षक पदावर मिळालीबढती
जालना :
जालना जिल्हा पोलीस दलातील 10 सहाय्यक फौजदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याच्या आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे यांनी आज काढले आहेत.
यामध्ये पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार भागोजी नबाजी पांढरे, दिगंबर किसनराव हवाले, अशोक भिकाजी टेहरे, अंबड पोलीस ठाण्यातील मारियो बनाट स्कॉट, हसनाबाद पोलीस ठाण्याचे शिवाजी भीमराव देशमुख, गोंदी पोलीस ठाण्याचे शेख महंमद शेख इब्राहिम मौलाना, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बाळासाहेब गजाननराव खंडागळे, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सय्यद अहमद सय्यद जमालोद्दीन, बदनापूर पोलीस ठाण्याचे भाऊसाहेब तुकाराम सहाणे आणि मोटार परिवहन विभागातील रामचंद्र दगडुजी भोसले यांना बढती देण्यात आली आहे.