जालना जिल्हा

धनगर जमातीमध्ये आनंदाचे वातावरण-बाबा आटोळे

न्यूज जालना/प्रतिनिधी

images (60)
images (60)

आ. गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आदिवासी करीता राज्य सरकार ज्या योजना राबवत आहे त्याच योजना जशास तश्या धनगर जमातीला लागू झाल्यामुळे धनगर जमातीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ठीक ठिकाणी धनगर बांधव आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सह शिंदे फडणवीस सरकारचे आभार व्यक्त करीत आहे. अशी माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जालना जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चा चे सरचिटणीस बाबासाहेब आटोळे यांनी दिली आहे.
उन वारा वादळ पाऊस जंगली प्राणी सिंह वाघ लांडगे कोल्हे साप विंचू यांना न जुमानता मिळेल त्या ठिकाणी असेल त्या वातावरणात डोंगर-दऱ्या त कायमची भटकंती करणारा, विकासाच्या बाबतीत प्रचंड मागासलेल्या दारिद्र्याने ग्रासलेल्या भटक्या धनगर जमातीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता एसटी आरक्षण गरजेचे असून.. भटक्या धनगर जमाती ला एसटी आरक्षण अंमलबजावणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्य शासनामार्फत ज्या योजना आदिवासी जमातीला दिल्या जातात त्या योजना कायम भटकंती करणाऱ्या धनगर जमातीला दिल्या जाव्यात अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून केली होती.
या बाबतीत त्यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्य सरकारच्या बजेटमध्ये याकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यात एकूण 22 प्रकारच्या योजना धनगर जमाती करिता राबविण्यात येणार आहेत.
२२ योजनांमध्ये १० हजार घरकुल अनुदान योजना, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सैनिक भरती प्रक्रिया आणि पोलीस भरती प्रक्रिया साठी तसेच स्पर्धा परीक्षासाठी प्रशिक्षण योजना, विभागीय स्तरावर वसतिगृह उभारणे, मेंढ्यांना चरण्यासाठी जंगल उपलब्ध करून देणे, शेळ्या-मेंढ्यांचा विमा अशा विविध योजनांचा यात समावेश आहे.

याबरोबर धनगर जमातीच्या एस टी आरक्षण आंदोलन चळवळीत बलिदान केलेल्या तीन हुतात्मे धनगर बांधवाना प्रत्येकी दहा लाख रुपये अनुदान देऊन महाराष्ट्रात धनगर समाजाला दिलासा दिल्याने शिंदे फडणवीस सरकारचे आणी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बबनराव लोणीकर, नगरसेवक योगेश जानकर यांचे आम्ही आभार व्यक्त करतो असेही या पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!