घनसावंगी तालुका

मराठवाड़ा शिक्षक आमदार विक्रम काळे यांची कुंभारपिंपळगाव येथे सदिच्छा भेट

Video


कुंभार पिंपळगाव :
मराठवाड़ा शिक्षक आमदार विक्रम काळे यानी स भु प्रशाला,कुंभारपिंपळगाव येथे सदिच्छा भेट दिली व शिक्षकांच्या आडीअडचणी जाणून घेतल्या. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक मधुकर बिरहारे सरांनी मा.शिक्षक आमदार विक्रम काळे साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर उपमुख्याध्यापक सुभाष देठे सरांनी सोबत आलेल्या खोजे ,ढोले सर,कांबळे या शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी प्रास्ताविक सुभाष देठे केले त्यानंतर आमदार विक्रम काळे सरांनी शिक्षकांच्या अडीअडचणी कशा सोडवल्या,तसेच शिक्षक समस्यांना विधानभवनात मांडून योग्य उपाययोजना कशा केल्या त्या सांगितल्या.तसेच सद्याच्या परिस्थितीत शिक्षकानं विषयी चालू असणाऱ्या वादावर विधान परिषदेत आवाज उठवला हे नमूद केले.

images (60)
images (60)

या वेळी झालेल्या बैठकीत बजरंग व्यवहारे यांनी गाव व शाळा यांना जोडणारा रस्ता माजी शिक्षक आमदार कै. दस्तुरकर यांच्या निधीतून सुरुवातीला बनवला गेला होता. सद्या त्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असून परिसरातील तीन ही शाळेत येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना या रस्त्यावरून चालता येणं ही अवघड झाल आहे या कडे लक्ष देण्याची मागणी केली. तसेच सुधाकर येवतीकार यांनी विज्ञान प्रदर्शनात राज्य पातळीवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत त्याचे गुण किंवा ग्रेड देण्यात यावे या साठी प्रयत्न करण्याची मागणी केली. तसेच राजकुमार वडले व संजय बोटे यांनी चतुर्थ श्रेणी ची भरती सुरू करण्याची तसेच विद्यार्थी संख्येवर पदभरती ची मागणी व विनंती केली. आदरणिय विक्रम काळे सर्व समस्यांवर उपाय योजना करण्याची मान्यता दिली. तसेच शिक्षक आमदार निवडणुकी साठी शिक्षकांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग व्यवहारे केले तर आभार प्रदर्शन मा.मुख्याध्यापक मधुकर बिरहारे मानले.या बैठकीला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!