मोदींच्या वाढदिवशी युवक काँग्रेसचे बेरोजगारीवर आंदोलन
मधुकर सहाने : भोकरदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता.जालना जिल्हा युवक काँग्रेस ने जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वात मोदींचा वाढदिवस हा 'राष्ट्रीय बेरोजगारी दिवस' म्हणून साजरा करणार केला.यावेळी बोलतांना युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख म्हणाले कि वेदांता-फॉक्सकॉम सारख्या मोठ्या कंपन्या महाराष्ट्र सोडून गुजरात कडे गेल्या,वर्षाला दोन कोटी रोजगार देणार असल्याचे पोकळ आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिली.याउलट नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे कोट्यवधी तरुणांना आपले रोजगार सोडायला मोदींनी भाग पाडले,या गोष्टींचा अनोख्या पद्धतीने निषेध म्हणून 2014 साली बेरोजगारी चा पोस्टर बॉय ठरलेल्या 'युवाओ को बेरोजगार करनेवालो जनता माफ नहीं करेगी' फेम युवकाचे फेस मास्क लावून आंदोलन करीत आहोत यावेळी जनता माफ नहीं करेगी,दो कोटी रोजगार कहा गये,कसकाय शिंदे बरं हाय का वेदांता पळाली खरं हाय का,पन्नास खोके एकदम ओक च्या घोषणा देण्यात आल्या
.
जालना शहरातील गांधीचमन परिसरामध्ये हे आंदोलन पार पडले यावेळी जालना जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल देशमुख, मा नगरसेवक शेख शकील, जालना विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष शेख वसीम,भोकरदन विधानसभा अध्यक्ष महेश दसपुते,बदनापूर विधानसभा अध्यक्ष दीपक कायंदे,परतूर विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, चैतन्य जायभाय सचिव महा प्रेदश युवक काँग्रेस, जालना जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष देवराज डोंगरे,सचिन कचरे महासचिव जालना जिल्हा युवक काँग्रेस,बदनापुर युवक काँग्रेस अध्यक्ष राजू शेख, रघुवीर गुढ़े,भोकरदन शहर अध्यक्ष रफीक कादरी,ओ बी सी तालुका अध्यक्ष राजीव जाहीबहार,राहुल घायवट शुभम देशमुख सेवादल अध्यक्ष विष्णू भालेराव शेख अनवर,शेख शेख यूनुस सेतु,युनाफ़,खान शफ़ीक़,सय्यद एज़ाज़, फयाज़, सय्यद ईरफान, अकबर तंबोली, अतीक तंबोली, शेख करीम, काबुदा, शैबाज़ फौजी,मोबिन बेग, आमेर खान, अज़ीम बागवान, आतिफ़ अंसारी, आकाश, नितिन हेलगट, नदीम पहेलवान, संतोष जाधव, सुनील घुमारे, राहिल खान,इमरान बागवान, मुजीब खान, चाउस, शेख हैदर, देशमुख मामा, अनिक देशमुख, देशमुख मामा, स्वप्निल जोशी, सादात खान,शेख अब्दुल सत्तार, नेहाल,मोनू, नज़ीर अंसारी, मज़हर मनियार,