घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

चेअरमन सतिष घाटगे यांच्या पुढाकाराने शेवता येथील जनावरांना मोफत लसीकरण

न्यूज जालना/प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील शेवता येथे समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे यांच्या पुढाकाराने सोमवार (ता.१९) रोजी जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले.
जनावरांवर आलेल्या लंम्पी स्कीन या चर्मरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अंतरवाली टेंभी जिल्हा परिषद गटातील गावात मोफत लसीकरण करण्यास सुरुवात केली.त्याचाच भाग म्हणून शेवता येथील जनावरांवर मोफत लसीकरण करण्यात आले.
सध्याच्या लंम्पी स्कीन लसीची टंचाई भासत असल्याने पशुपालक व शेतकरी हैराण होत आहेत. या मोफत लसीकरण मोहिमेमुळे पशुपालक व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहेत.
या लसीकरण मोहीमेमुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
या लसीकरणासाठी डॉ.मदन लाड,डॉ.वैभव लाड,डॉ. विनोद नाईकवाडे,डॉ.राम भिंगले,डॉ.विनोद पवार यांनी सहकार्य केले.
यावेळी शिवसेना पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम उढाण,अमजद पठाण,कृष्णा उढाण,दत्ता लाड,शाहु जाधव,विष्णू वाघमारे,राजु कदम,हनुमान कापले,हरी लाड,विनोद लाड,संजु काचकडे,चंद्रकांत सौंदरमल, अच्युत बांगर यांच्यासह असंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!