शांतता-सुव्यवस्थेसह सण उत्सव साजरा करा – उपविभागीय पोलीस अधिकारी मोरे
परतूर येथे बैठक शांतता समितीची बैठक संपन्न..
दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
परतूर शांतता व सुव्यवस्था राखत नागरिकांनी आगामी काळातील नवरात्र उत्सव साजरा करावे असे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांनी केले.
येथील पोलीस ठाण्यात रविवारी(ता.25) रोजी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली.तेव्हा ते बोलत होते यावेळी पोलीस निरीक्षक शामसूंदर कौठाळे,पोलीस उपनिरीक्षक नितीन गुट्टेवार,विजय राखे,अंकुश तेलगड,माधवराव कदम,अशोकराव आघाव,डॉ.संजय पुरी,संभाजी तिडके,रामकांत बरीदे,पांडुरंग नवल,द.या.काटे गोपीनाथ शाखेचे संजय वैद्य,याची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्री.पोलीस निरीक्षक यांनी नवरात्र उत्सव निमित्ताने शासनाने घालुन दिलेल्या नियमांची माहिती दिली.दरम्यान यावेळी गणेशोत्सवात उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबवलेल्या प्रथम क्रमांक संत सावता गणेश मंडळ,दुतीय जय बजरंग गणेश मंडळ,तृतीय रामेश्वर गणेश मंडळ यांना पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.यावेळी मा.नगरसेवक अखिल काजी,सुधाकर निकाळजे,गणेश राजबिंडे,रवी देशपांडे,कृष्णा सोनवणे,योगेश काटे,योगेश गायकवाड, विजय यादव,रोहित कपाळे,मुन्ना चितोडा,योगेश बरीदे,भारत सवणे,राहुल मुजमुले,कैलास चव्हाण आदी सह नागरिक उपस्थित होते.