विरेगव्हाण तांडा-गोपीचंदनगर येथे २५० जनावरांंना मोफत लंम्पी प्रतिबंधक लसीकरण

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा -गोपीचंदनगर येथे कर्मयोगी स्व.अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने लंम्पी स्किन चर्मरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी (दि.२५) मंगळवार रोजी २५० जनावरांना मोफत लंम्पी लसीकरण करण्यात आले.यावेळी सहाय्यक पशुधन अधिकारी डॉ.बाळासाहेब राजूरकर,डॉ.बळीराम गोरे यांनी जनावरांना लस टोचली.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप राऊत,माजी सरपंच तुकाराम पवार,जालिंदर पवार,रावसाहेब राठोड, वसंत पवार,सोपान राठोड,दिलीप पवार,जगण राठोड,विष्णू राठोड,संतोष पवार,दिलीप राठोड,रमेश राठोड,सुधाकर साबळे,पप्पू पवार,राजकुमार पवार,संजय राठोड,आबासाहेब राऊत,रमेश शिंदे,सिद्धार्थ गाढे,शिवाजी कंटुले,भगवान साबळे,रहिम पठाण,पंडित लोंढे,नामदेव राऊत,बाळासाहेब सुराशे यांची उपस्थिती होती.