घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
लिंबोणी येथे २०० पशुधनांना मोफत लंम्पीचे लसीकरण

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील लिंबोणी येथे शिक्षणमहर्षी स्व.अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त (दि.२६) सोमवार रोजी लंम्पी चर्मरोग संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील २०० पशुधनांना मोफत लंम्पीचे लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. दातवाशे,डॉ. मुगशे यांनी पशुधनांना लस टोचली. यावेळी माजी सरपंच सुंदर काळे,सोशल मिडिया विभाग प्रमुख योगेश काळे,राहुल काळे,भास्कर शेजुळ,सर्जेराव काळे,संभाजी काळे,गणेश काळे,सारंगधर काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.