घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगावात २०० जनावरांना मोफत लंम्पी लसीकरण

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे शिक्षणमहर्षी माजी खासदार स्व अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी येथील सरपंच शाहजानबी पठाण यांच्यावतीने आज (दि 27) वार मंगळवार रोजी 200 जनावरांना मोफत लंम्पी लसीकरण करण्यात आले.यावेळी माजी सहाय्यक पशुधन आयुक्त डॉ. बाळासाहेब राजूरकर, डॉ. बळीराम गोरे यांनी पशुधनांना लस टोचली.
आले.या मोफत लंम्पी लसीकरणामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत असल्याने ग्रामस्थांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सरपंच प्रतिनिधी अनवर पठाण,संचालक अखिजमखा पठाण,लक्ष्मण कंटुले,रामेश्वर लोया,उत्तम कंटुले,अंकुश रोकडे,नाना महानोर,नाजेम पठाण,रोहिदास शिंदे यांची उपस्थिती होती.