कुंभार पिंपळगाव येथील वीजपुरवठा पूर्ववत सुरु करा; नसता रास्तारोको आंदोलन करू…
व्यापारी महासंघाचे उपकार्यकारी अभियंता घनसावंगी यांना निवेदन
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील तब्बल सात रोहित्र जळाल्याने मागील पंधरा दिवसांपासून हे गाव अंधारात आहे.येथील नादुरुस्त रोहित्राची दुरूस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत तत्काळ सुरळीत सुरू करण्याची मागणी व्यापारी महासंघ यांच्या वतीने गुरूवार (ता.२९) रोजी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कुंभार पिंपळगाव हे तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे.या गावात रोहित्र जळण्याची मालिका सुरूच आहे.त्यामुळे वीजेवर चालणारी अनेक उपकरणे बंद पडलेली आहे.त्याचा विपरीत परीणाम व्यावसायिकांवर होत आहे.वीज नसल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी तर महिलांच्या पाण्यासाठी अडचण होत आहे.त्यातच रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरते.परीणामी, नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.येत्या ४ ऑक्टोबर वीजपुरवठा पूर्ववत सुरु न केल्यास बाजारपेठा बंद ठेवून तीव्र रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले,अतुल बोकण,प्रकाश कंटुले,विजय कंटुले,भास्करराव कंटुले, ज्ञानेश्वर दहिवाळ,निलेश तौर,अमित पंडा,महेश गुजर, मंगेश जाधव,गणेश कंटुले यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.