कुंभार पिंपळगावात मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा ५१२ रूग्णांना आधार,१०९ रूग्णांवर शस्त्रक्रिया होणार

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी कुलदीप पवार
तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,समाजभान टिम आणि गणपती नेत्रालय जालना यांच्या सौजन्याने शुक्रवार (ता.३०) रोजी आयोजित मोफत नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिरात एकुण ५१२ रूग्णांची तज्ञ डॉक्टरांनी अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने मोफत तपासणी करण्यात आली.या शिबिराअंतर्गत १०९ रूग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे.या शिबिराचे उदघाटन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मराठवाडा कक्ष प्रमुख दादासाहेब थेटे यांच्याहस्ते करण्यात आले.
या शिबिरात गेवराई व माजलगाव तालुक्यातील रूग्णांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्य प्रेरणेतून आणि डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सुचनेवरून मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे,राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील अग्रगण्य गणपती नेत्र रूग्णालयाच्या माध्यमातून हे शिबीर पार पडले.तळागाळातील सर्वसामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मराठवाडा टीम सर्व लोकापर्यंत पोहचून शिबिराचे आयोजन करीत आहे.
आज झालेल्या शिबिरातून केवळ मोतिबिंदूच्याच नव्हे तर डोळ्यांच्या इतर आजारावरही शस्त्रक्रिया होणार आहे.शिबीर म्हणजे प्रत्येक माणसाला आरोग्यसेवा पुरवण्याचा दवाखाना हा विचार मानून आम्ही प्रत्येक माणसाला आरोग्यसेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत यासाठी आम्हाला मंगेश चिवटे आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे वेळोवेळी सहकार्य मिळते असे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मराठवाडा प्रमुख दादासाहेब थेटे यांनी सांगितले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी अरविंद दहिवाळ,अशोक कंटुले,आप्पासाहेब कंटुले, आसाराम राऊत, प्रवीण दहिवाळ,अशोक उदावंत, आकाश चाफाकानडे, कुलदीप आर्दड,सोनाजी कंटुले, विक्रम राऊत,किशोर मोरे,शरद चाफाकानडे,किरण राठी,संदिप कंटुले,अशोक शाहा,विक्रम राऊत,राहुल उदावंत,ज्ञानेश्वर जाधव,राहुल पवार,अंकुश कंटुले,सोपान देवकर,उदय भंडारी,कृष्णा गाडेकर,विजय मिसाळ, गणेश तौर,माऊली तौर,रमेश शिंदे,धीरज आर्दड,कृष्णा आर्दड,कृष्णा डोंगरे,अक्षय नाईक,विनोद चव्हाण यांच्यासह आदींनी सहकार्य केले.