जांबसमर्थ मुर्ती चोरी प्रकरणी पोलिसांनी जाहीर केले 2 लाख रूपयांचे बक्षीस
न्यूज जालना/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ गावातील समर्थ रामदास स्वामी पुजा करीत असलेल्या राम,लक्ष्मण,सीता, हनूमान अशा अन्य मुर्तीची चोरी झाल्याची घटना दि.२२ ऑगस्ट रोजी घडली होती.याप्रकरणी पुजारी धनंजय देशपांडे यांच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा जालना हे करीत आहेत.जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिसांना हाती काहीच लागलेले नाही.सदरील गुन्हा उघडकीस आणून मुर्ती चोरीचा लवकर तपास लागावा यासाठी चोरीबाबत उपयुक्त माहिती देणाऱ्यास पोलीस दलातर्फे 2 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.गुन्हा उघडकीस येण्याच्या अनूषंगाने काही उपयुक्त माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.