घनसावंगी तालुकाजालना जिल्हापरतूर तालुका

गुंज बु.येथे सदगुरू राजाराम महाराज यांची पुण्यतिथी व पालखी सोहळा संपन्न

कुलदीप पवार/प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील गुंज बु.येथे सदगुरु राजाराम महाराज यांची पुण्यतिथी व पालखी सोहळा आज (दि.१३) ऑक्टोंबर वार गुरूवार रोजी माजीमंत्री तथा परतूर मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह भाविक व असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी पुढे बोलताना आ.लोणीकर म्हणाले की,सदगुरू राजाराम महाराज यांनी घालून दिलेल्या आदर्शावर खऱ्या अर्थाने समाज व्यवस्था चालली पाहिजे.सामाजिक अखंडता,एकोपा जपून धार्मिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजाची साखळी निर्माण झाली पाहिजे.यासाठी सदगुरू राजाराम महाराज यांचे मोठे योगदान असून त्यांचे महात्म्य तितके थोर असून विचारांची जपवणूक करण्याची आवश्यकता असून संत महंतांचे विचार खऱ्या अर्थाने जगाला करणारे असल्याचे मत माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.राज्य शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र आराखडा अंतर्गत सदगुरु राजाराम महाराज यांच्या मंदिरासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आ.बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
यावेळी गजानन गुरूजी गुंजकर,तुकाराम गुंजकर,मुरलीधर चौधरी, संजय तौर,अंकुशराव बोबडे,कैलाश शेळके,भास्कर पांढरे,गोविंद ढेबरे,गणेश कदम,अमर काळे,अशोक जाधव, अमोल काळे,बाळासाहेब बहीर,यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!