घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
राहुल लोणीकर यांची निवड झाल्याबद्दल कुंभार पिंपळगावात फटाके फोडून जल्लोष
कुलदीप पवार/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची निवड झाल्याबद्दल घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे शनिवारी (१५) फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय तौर,बाजार समितीचे संचालक शिवाजी कंटुले,बाळासाहेब बहीर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.