कुंभार पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महारूद्र मंदिरात दि.२७ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सात दिवसीय हरीनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे.यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार हजेरी लावणार आहेत. दि.२७ वार गुरूवार रोजी ह.भ.प. शितलताई साबळे,शुक्रवार रोजी ह.भ.प. गजानन महाराज शास्री,शनिवार रोजी ह.भ.प.शिवा महाराज बावसकर, रविवार रोजी ह.भ.प.अक्रुर महाराज साखरे,सोमवार रोजी ह.भ.प.कबीर महाराज अत्तार, मंगळवार रोजी ह.भ.प.प्रकाश महाराज साठे, बुधवार रोजी ह.भ.प.सोपान महाराज सानप यांचे हरीकिर्तन होणार असून दि.३ नोव्हेंबर २०२२ वार गुरूवार रोजी ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांच्या काल्याचे किर्तन होणार असून महाप्रसाद वाटपाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी आयोजित किर्तन श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे