तिर्थपुरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
न्यूज जालना/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील अनिरुद्ध ज्ञानदेव शिंदे (वय ४०) यांचा काल दि.२९ ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.यासंदर्भात अधिक माहिती अशी की रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान ११२ या क्रमांकावर अज्ञात कॉलरने फोन करून माहिती दिली की तीर्थपुरी घनसावंगी रोडवर एस पी पाटील शाळेच्या नजीक एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने उडवले असून तो गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आहे. या माहितीवरून त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी योगेश दाभाडे हे तात्काळ पोहोचले. त्यांनी शिंदे यांना उचलून तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.त्यांच्या प्रेताची उतरणीय तपासणी आज दि.३० रोजी दुपारी एक वाजता करण्यात आली.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,पत्नी असा परिवार आहे.दरम्यान शिंदे यांची दुचाकी तीर्थपुरी येथील दुर्गा देवी मंदिराच्या परिसरात लावलेली आहे. मग ते इतक्या रात्री त्या ठिकाणी कशासाठी गेले असा प्रश्न उपस्थित राहत आहे. पोलिसांनी रात्री यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून नातेवाईकांची तक्रार आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल असे पोलीस कर्मचारी नारायण माळी यांनी सांगितले.