घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगावात वीजचोरी करणाऱ्या विरोधात धडक कारवाई

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मंगळवार (दि.०१) रोजी वीजचोरी करणाऱ्या आकडेबहाद्दराविरोधात धडक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. दिवसभर राबविण्यात आलेल्या मोहिमेत दोनशे पेक्षा अधिक आकडे जप्त करण्यात आलेले असून दंडाची रक्कम न भरल्यास दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वीजवितरणच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान कुंभार पिंपळगाव येथे आज ठिकठिकाणी मोहीम राबविण्यात आली.यावेळी उपकार्यकारी अभियंता जयेश सुर्यवंशी,सहाय्यक अभियंता निमजे,थिटे,सहाय्यक उपअभियंता प्रशांत कांबळे यांच्यासह घनसावंगी रांजणी,राणीउंचेगाव येथील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.