त्या मूर्तीचोराचे आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये,
जांबसमर्थ मुर्ती चोरी प्रकरणी घनसावंगी वकील संघाचा ठराव
जालना:
जांबसमर्थ येथे समर्थांच्या देव्हाºयातील झालेल्या मुर्ती चोरी प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात घनसावंगी वकील संघाच्यावतीने आरोपींचे कोणत्याही वकील सदस्यांनी वकीलपत्र दाखल करून धेऊ नये असा ठराव घेतला आहे.
दि.१ नोव्हेंबर रोजी घनसावंगी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस.आर.धायतडक यांच्या अध्यक्षतेखाली श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणातील आरोपींच्यावतीने घनसावंगी न्यायालयातील कोणत्याही वकील सदस्यांनी आरोपींचे वकीलपत्र दाखल करू नये अशा प्रकारचा ठराव अॅड.शामसुंदर तांगडे यांनी सूचक म्हणून ठराव मांडला होता. त्यास अॅड.गजेंद्र तांगडे यांच्यासह सर्व सदस्यांनी सर्व संमतीने पाठींबा दर्शविला. तसेच श्रीराम मंदिर देवस्थान यांच्यावतीने सदर प्रकरणात न्यायालयीन कामकाजासाठी देवस्थान समितीकडून कोणत्याही प्रकारचा खर्च न घेता स्वखर्चाने घनसावंगी वकील संघातील सर्व सन्माननीय सदस्य कामकाज करतील असाही ठराव सर्वानूमते मंजूर करण्यात आला आहे. धनसावंगी वकील संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या सदरील निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. यावेळी अॅड.शामसुंदर तांगडे, अॅड.व्ही.ए. तौर, अॅड.जी. जी. तांगडे, अॅड. वागदरे, अॅड.के.आर.कुलकर्णी, अॅड.एस.जी.देवडे, अॅड.ए.के.माने, अॅड.एस.व्ही. चव्हाण आदींची उपस्थिती होती.