घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
मासेगाव येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथे ६ नोव्हेंबरपासून अखंड हरीनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण व संगीत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात हभप लक्ष्मण महाराज उबाळे, सतीश महाराज जाधव,विलास महाराज गेजगे,विजय महाराज काळबांडे,अनिल महाराज पाटील, चांगदेव महाराज काकडे, बळीराम महाराज माघाडे यांचे किर्तन होणार आहेत.
१३ नोव्हेंबर रोजी सकाळी हभप उद्धव महाराज आनंदे यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.